भिवापूर येथे रूटमार्च
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदीले
भिवापूर :- मनात कसलीही भिती न बाळगता निवडणुकीत भाग घेऊन मतदान करा असे आवाहन नागरिकांना सशस्त्र सीमा बल व भिवापूर पोलिसांनी रूट मार्च दरम्यान केले.
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पोलीस स्टेशन तर्फे आज सायंकाळी शहरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या रूट मार्च मध्ये 20 पोलीस अंमलदार व सशस्त्र सीमा बलाचे जवान सहभागी झाले होते. पोलीस स्टेशन परिसरातून सुरु झालेला रूट मार्च बस स्थानक परिसर, भीमा देवी चौक, मटण मार्केट, गणेश मंदिर चौक, विठ्ठल मंदिर चौक, आझाद चौक, रामधन चौक, गुजरी चौक मार्गे परत पोलीस स्टेशनला नेण्यात आला. नागरिकांनी निवडणूकिचे महत्व समजुन घेत आवर्जून मतदान करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.