DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- दि.२७/१०/२०२४ रोजी रात्री ०२.३० वाजेच्या सुमारास निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गाव शिवारातील गेल सोलर कंपनीच्या कंपाऊंड मधील ब्लॉक क्रमांक ४८ मधील ६९,०००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली होती त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१५/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दि.२७/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे ०१) देविदास बंडु थोरात रा. रायपुर ता. साक्री जि. धुळे, २) देविदास वेडु वाघमोडे, ३) रविंद्र धवळु कारंडे, ४) ज्ञानेश्वर दामु कारंडे, ५) बापु लहानु कारंडे सर्व रा. धमनार ता. साक्री जि.धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या
आत ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल तसेच लोखंडी कटर असे एकुण १,०९,०००/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. किशोर काळे,
अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि / श्री मयुर भामरे, पोउनि / प्रदिप सोनवणे, पोउनि /यशवंत भामरे, पोउनि / मधुकर सोमासे, पोहेकॉ / रतन मोरे, पोहेकॉ/ प्रदिप आखाडे, पोना / खंडेराव पवार, पोकॉ/ परमेश्वर
चव्हाण, पोकॉ/ प्रविण पवार, पोकॉ / श्रीराम पदमर, पोकॉ/फुलसिंग वसावे, पोकॉ/ पृथ्वीराज शिंदे, चापोसई /अमरसिंग पवार अशांनी केली आहे.