DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना कार्य गौरव सोहळ्यात विद्या विकास मंडळाचे सि. गो. पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री च्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे आयोजित “राष्ट्रीय सेवा योजना कार्य गौरव सोहळा 2023-24” या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर विविध शिबिरात सहभागी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कु. क्रांती मोरे, अरुण राठोड, राणी माळचे, आनंदी देसाई, कल्पेश पगारे, जयेश गवडे, मुकेश राठोड, मोहम्मद पिंजारी, राजेश गायकवाड या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून युवक कल्याण व क्रीडा मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कबचौ उमवी जळगाव चे कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त सदस्य मा. राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष सौ. मंगलाताई सुरेश पाटील, सचिव सुरेश रामराव पाटील, उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील, सी. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील व प्राध्यापक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.