DPT NEWS NETWORK 🗞️✍️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड :- बिलोली पोलीस स्टेशन येथे बिलोली पोलीस पाटलाच्या वातीने 2 जानेवारी पोलीस स्थापना दीना निमित्त कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बिलोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीमान अतुलजी भोसले उपाध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमान ज्ञानेश्वर शिंदे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शेख सर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी दगडे, चंदणकर सर, कलीम पटेल पोलीस पाटील येसगी व सर्व पोलीस कर्मचारी व ग्रह रक्षकदलाचे कर्मचारी पत्रकार बंधू उपस्थित होते .
उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे पत्रकार बंधुचे ग्रह रक्षकदलाचे या सर्वांचे शॉल श्रीफळ व पुस्पगुच्छ देऊन सर्व पोलीस पाटलाच्या वतीने स्वागत करण्यात आले व मनोगत व्यक्त करण्यात आले त्यावेळेस लघुळ चे पोलीस पाटील नागमनीताई देशमुख कासराळी चे पोलीस पाटील माधवजी ठक्करवाड व सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर भाऊ कुडके या सर्वांनी पोलीस स्थापना दिनानिमित्त माहिती दिले.
2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजारा केला जातो.
असे सांगून पोलीस व पोलीस पाटलांची व जनतेची जबाबदारी काय असते कायदा सुव्यवस्था कशी टिकवता येते असे बिलोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीमान अतुलजी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व जेष्ठ प्रत्रकार अशोकराव दगडे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळेस उपस्थित पोलीस पाटील वर्षा जामणोर, ज्ञानेश्वरी गजलवार, भोसले पाटील, श्रीदेवी महाजन, जाधव पाटील, स्वामी पाटील, कांदामवार पाटील, शेळके पाटील, कमलाकर जमदाडे, साहेबराव डोंगरे पाटील, अब्दुल शेख, अरुण पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला