DPT NEWS NETWORK 🗞️✍️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड:- पोलीस दलातर्फे दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी रेजिंग डे साजरा केला जात आहे. दिनांक 02 ते 08 जानेवारी दरम्यान वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचा भाग म्हणुन आज दिनांक 02 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 07.00 ते 08. 00 वा. च्या दरम्यान मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे नेतृत्वाखाली दौड चे आयोजन करण्यात आले. सदर दौडला मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवुन दौडला सुरूवात करण्यात आली. नांदेड शहरातील सर्व पोस्टे चे पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा प्रभारी तसेच क्युआरटी, आरसीपी, पोलीस मुख्यालय येथील अंमलदार, तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तसेच न्यु फोर्स अॅकडमीचे विध्यार्थी सोबतच पोलीस मित्र आणि वेगवेगळ्या महाविद्यालयाचे तरूण यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. सदरची दौड ही पोलीस अधिक्षक कार्यालय येथुन सुरू होवुन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा गांधी स्मारक, गुरुव्दारा चौक, देना बैंक, महावीर चौक, वजिराबाद चौक, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय, नांदेड येथे दौड संपन्न झाली.
या प्रसंगी मा. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी दौड मध्य स्वतः भाग घेऊन तरूणांना पोलीस दलाचे कामाजाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर दौड करीता मा. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, नांदेड, तसेच शहरातील सर्व पोस्टे चे प्रभारी अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.