DPT NEWS NETWORK 🗞️✍️✍️ प्रतिनिधी:- गोकुळ नगराळे
साक्री:- साक्री तालुक्यात दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी साईराज ऑटो मोबाइल चे उद्घाटन करण्यात आले.
साक्री तालुक्यातील दोन तरुण जिवलग मित्र समाधान मोरे व ज्ञानेश्वर ढोले यांनी कलंभिर या गावात आपला व्यवसायास केली सुरुवात आज कालचे युवक मोठ्या शहरात जॉब साठी धडपड करतात परंतु या दोन तरुणांनी गावातीलच लोकांना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सेवा पुरविण्याचा निश्चय केला आणि आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर त्यांनी आपला व्यवसाय थाटला.
या शॉप च्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साक्री येथिल गौतम पाटील, मुकूंद पवार यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी मित्र परीवार सागर जाधव, संदिप मारणर, भटू सरक,समाधान सरक, दिनेश सोनवणे, ज्ञानु थोरात, मयूर शिवदे, अजय बोरकर आणि ग्रामस्थ आणि मित्र मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यात राजेंद्र वंजी मोरे, मुकेश मोरे, मनोहर ठाकरे, गोकुळ नगराळे, गोरख थोरात, हर्षल देवरे, सुभाष थोरात, इत्यादि ग्रामस्थांनी उपस्थिती लावली.
प्रो.प्रा. समाधान मोरे व प्रो.प्रा. ज्ञानेश्वर ढोले या तरुणांना त्यांच्या व्यवसायासाठी व पुढील भविष्याच्या वाटचालीस गावकऱ्यांनी व मित्र परिवारांने शुभेच्छा दिल्या.