
DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर गुट्टे
किनवट:- पोलीस स्टेशन किनवट हद्दीतील चिखली (बु.) येथे आज दिनांक 31/1/2025 रोजी पोलीस विभाग, वन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी डॉ. खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधिक्षक भोकर यांचे नेतृत्वाखाली संयुक्त पणे कोंबिंग ऑपरेशन राबवले. सदरची कार्यवाही पहाटे 04:30 ते 07:00. दरम्यान करण्यात आली. कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहीजे फरारी आरोपी, सागवान तस्कर, वाहन चोर यांना चेक करण्यात आले. चिखली गावाचे शेजारील गावांमधील राखीव जंगलातील सागवानी झाडांची अवैध कत्तल करुन त्याचे घरात व घराशेजारी ठेवलेला अंदाजे 7 ते 8 लाखाचा 200 घनफुट अवैध सागवान लाकडाचा साठा, सागी कट साईज व इमारती सागी गोल माल जप्त करण्यात आला. तीन वाहने जप्त करण्यात आली, तसेच रेकॉर्डवरील आरोपी चेक करण्यात आले. सदरची कारवाई करीत असतांना सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे 25 ते 30 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपवन संरक्षक केशव वाबळे, उपवन संरक्षक बि. एन. स्वामी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांचे निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीसाहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड, रोहीत जाधव, सचिन धनगे, उमेश ढगे, अमोल काशिकर मोटार वाहन निरीक्षक तापकीरे सर, पोलीस निरीक्षक बिलां सर, चोपडे, काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे सर, जाधव, पीएसआय झाडे सर तसेच पोलीस विभाग, वनविभाग, प्रादेशीक परिवहन विभाग यांनीही कारवाईत सहभाग घेतला होता.