Mohammad Siraj : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतरचा एक खास किस्सा शेअर केला आहे. ज्यावेळी आयपीएलमध्ये पहिली बोली लागल्यानंतर त्याने सर्वात आधी iPhone 7+ खरेदी केला होता. यासोबतच त्याने एक जुनी कारही खरेदी केली होती. RCB च्या पॉडकास्टमध्ये सिराजनं कारसंदर्भातील मजेशीर किस्सा शेअर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ने नुकतीच10 पॉडकास्ट एपिसोडची सिरीज रिलीज केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून RCB चे दिग्गज खेळाडूंनी आयपीएलसंदर्भातील खास किस्से शेअर केले आहेत. पॉडकास्टमध्ये सिराज म्हणाला की, ‘ आयपीएलमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मी एक iPhone 7+ खरेदी केला होता. त्यानंतर मी एक जुनी कार खरेदी केली. कधीपर्यंत मी प्लॅटिनावरुन जायचे. IPL खेळाडूकडे कार असायला पाहिजे, या विचारातून कार घेतल्याचे त्याने सांगितले.
गंमत अशी की त्याने कोरोला कार खरेदी केली खरी पण त्याला ड्रायव्हिंग येत नव्हते. त्यामुळे त्याला कार चालवण्यासाठी आपल्या चुलत भावाची मदत घ्यावी लागली. कारसंदर्भातील एक मजेशीर किस्साही त्याने शेअर केला. तो म्हणाला की, आम्ही एकदा एका कार्यक्रमासाठी गेलो होते. कोरोला कारमध्ये एसी नसल्यामुळे खिडक्या उघड्या ठेवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हवा खेळती राहण्यासाठी आम्ही कारच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या. कारमध्ये पाहून रस्त्याने लोक सिराज सिराज ओरडायचे. अधिक उकाडा असल्यामुळे यावेळी काच बंदही करता यायची नाही, असेही त्याने सांगितले. त्यानंतर वर्षभरात मर्सिडिज खरेदी केल्याचे सिराजने सांगितले.