DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- इचलकरंजी महानगरपालिका कर्मचारी समन्वय समीतीच्या वतीने ए.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण चालू असलेला तिसरा दिवसात सुध्दा दखल न घेतल्याचे लक्षात आल्याने इचलकरंजी शहरातील बहुचर्चित बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने त्या घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर झालेला अन्याय व त्यांच्या मागण्या ह्या कायदेशीर बाबी योग्य होत्या. तरी देखील कंत्राटी मालक व इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी हे एकमेकांच्या सल्ल्याने गेले दोन-तीन दिवस आमरण उपोषणासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष न देता त्यांची दिशाभूल करत होते. हे स्पष्ट निदर्शनास आल्यानंतर बहुजन सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रशासन अधिकारी यांना धारेवर धरून तातडीने त्यांच्याशी बैठक केली. त्या बैठकीत महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी उपायुक्त अशोक कुंभार, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार व कंत्राटी मालक यांच्याशी चर्चेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. सर्वप्रथम कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांची रीतसर पगारातून पैसे कपात करून त्यांना त्यांच्या पावत्या द्याव्यात. कंत्राटी कर्मचाऱ्यांना रीतसर ईएसआय मोबदला द्यावा, तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांना कामात वापरण्यासाठी संरक्षण किट (वस्तू ) मिळाव्यात. अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्यानंतर प्रशासन अधिकारी यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मीटिंग घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रमुख ए.बी. पाटील यांना घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व मागणी मान्य केल्या आहेत. पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत. महापालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार, महापालिकेचे कामगार अधिकारी विजय राजापुरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार यांनी आमरण उपोषणसाठी बसलेले 12 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरबत देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले. उपोषणाच्या तीन दिवसाचा पगार त्यांना दिला जाईल. अशी त्यांना आनंदाची बातमी देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे.अशी सुचना देऊन आमरण उपोषण सोडल्यामुळे शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस बहुजन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे ,सामाजिक कार्यकर्ते राजू निर्मळे पदाधिकारी इस्माईल ऐनापुरे,सुरेखा काटकर, सलीम मुल्ला, असिफ संजापुरे, हबीब शेख, बबलू गागडे, राजू टिळंगे इतर संघटना प्रमुख व कर्मचारी उपस्थितीत होते.