नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

IPL Auction 2022: खुद्द क्रीडा मंत्रीच लिलावाच्या रिंगणात

आयपीएलच्या २०२२ चा १५ वा हंगामासाठी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल मेगा लिलाव (IPL Mega Auction 2022) होणार आहे. यासाठी बीसीसीआयने ५९० खेळाडूंची यादी शॉर्टलिस्ट केली आहे. या यादीत पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary) देखील शॉर्टलिस्ट झाला आहे. (Sports Minister Of West Bengal Manoj Tiwary Short listed for IPL Auction 2022)

मनोज तिवारी आयपीएलमध्ये (IPL) यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायजिंग पुणे सुपरजायंट आणि पंजाब किंग्ज या संघाकडून खेळला आहे. त्याने ९८ सामन्यात १६९५ धावा केल्या असून यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर ७ विकेटही त्याच्या नावावर आहेत. त्याने शेवटचा सामना पंजाब किंग्जकडून (Panjab Kings) २०१८ ला खेळला होता. मनोज तिवारीने आपली बेस प्राईस ५० लाख रूपये ठेवली आहे.

मनोज तिवारीने आयपीएल २०२० (IPL 2022) च्या लिलावात देखील सहभाग घेतला होता. मात्र तो अनसोल्ड ठरला होता. यापूर्वी आयपीएल २०१८ च्या लिलावात मनोज तिवारीसाठी सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्याच रस्सीखेच झाली होती. अखेर पंजाब किंग्जने त्याला १ कोटी रूपये खर्चून आपल्या गोटात ओढले होते. पश्चिम बंगालचा माजी कर्णधार मनोज तिवारीने मध्यंतरी राजकारणात प्रवेश केला. त्याने २०२१ ची तृणमूल काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. तो शिबपूर मतदार संघातून निवडून आला. त्याने भाजपच्या रतिन चक्रवर्तीला पराभूत केले. तो सध्या ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:15 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!