नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळीत स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्यासव्वा बिले ग्रामस्थांचा आरोप; विज बिल पाहून ग्राहकांना बसला ४४० होल्टचा झटका.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) गावात एक महिन्यापूर्वी एका खाजगी कंपनीच्या वतीने स्मार्ट मिटर बसविण्यात आले आहे.या स्मार्ट वीज मीटरमुळे आता पाचपट वाढीव वीजबिले येवू लागल्याने घरघुती विज ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील बहुतेक जनता मजुरी व शेती करून आपला उदरनिर्वाह चालवितात दिवसभर कामानिमित्त शेतात असल्याने दिवसा विजेचा वापर ही कमी असतो तरीही जास्तीचे विज बिल देवून महावितरण कंपनीने शेवाळी गावातील जनतेला ४४० होल्टचा झटका दिल्याचे बोलले जात आहे. या गावातील विज ग्राहकांकडे कोणत्या अशा कंपन्या, उद्योग सूरू आहेत की ज्याच्यामुळे एवढे भरसमाठ विज बिल देण्यात येत आहे अशा संतप्त प्रतिक्रिया गांवकरी यांच्याकडून देण्यात येत आहेत.गावकऱ्यांकडून ही बिले कमी करून मिळावीत आणि स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबवावे, अशी मागणी या वेळी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

वाढीव वीजबिलामुळे शेवाळी (दा.) गावातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली असून, त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही बोलून दाखविला.नवे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी आधी ४०० ते ५०० रुपये बिल येत होते, आता तीन ते पाच हजारांवर बिल येत आहे. अशा वेळी मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अचानक वाढलेले बिल आणि महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात वेळेवर बिल भरले नाही, तर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत. काही विज ग्राहकांना आधी ३०० ते ५०० रू. विज बिल यायचे त्यांना आता १००० ते १२०० रूपयांचे बिल येत आहेत दरम्यान हजारांवर आलेले वीज बिल भरून कुंटुबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च कसा करायचा, काय खायचे आणि मुलांना शाळा कशी शिकवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरणने ग्राहकांची बिले तातडीने कमी करून द्यावी आणि स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे, यासाठी नागरिकांच्या वतीने साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावीत यांच्या कडेही पाठपुरावा केला जाईल अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

[स्मार्ट मिटर बसविण्यासाठी आमची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. स्मार्ट मिटर मुळे जास्तीचे विज बिल येत आहे. ८ ते १० कामानिमित्त शेतामध्ये राहतो म्हणून दिवसा विजेचा वापर कमी करूनही स्मार्ट मिटर मुळे जास्तीचे विज बिल येत आहे यामुळे आमची या स्मार्ट मिटर विषयी तक्रारीची महवितरण कंपनी व शासनाने दखल घ्यावी.
अशोक भगवान साळुंके शेवाळी (दा.)ग्रामस्थ स्मार्ट मिटर बसविण्यापूर्वी ४०० ते ५०० रू. विज बिल येत होते आता ३ ते ४ हजार येवू लागले हे पाहून मानसिक धक्का बसला. ड्रायवर व्यक्ती एवढे विज बिल भरण्यासाठी सक्षम नाही तरी महावितरण कंपनीने याची दखल घेवून काही तरी मार्ग काढावा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:41 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!