मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी काल (2 फेब्रुवारी) वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र,बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रमेश देव यांचे सुपुत्र अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. बुधवारी सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी 11 वाजता मुंबईतील (Mumbai)अंधेरीतील घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.