शहादा प्रतिनिधी:- राहुल आगळे
चौपाळे तालुका जिल्हा नंदुरबार येथील जागेत घर बांधल्याने वहिवाटीच्या रस्ता बंद झाल्याने न्यायालयात केस दाखल केल्याच्या रागातून नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली यात २६ वर्षीय युवकाच्या गुप्तांगावर लाथ मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे दीपक प्रकाश कुमावत वय २६ असे मयताचे नाव आहे बालचंद राठोड यांनी चौपाळे गावातील गावठाण जागेत घर बांधले आहे त्यामुळे गावातीलच संदीप कुमावत यांच्या वहिवाट रस्ता बंद झाल्याने त्याच्या वडिलांनी भालचंद्र राठोड, यांच्याविरुद्ध न्यायालयात केस दाखल केली आहे . या रागातून दोन्ही कुटुंबीय आमने-सामने भिडल्याने वाद झाला होता वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले गावातील चौकात संदीप कुमावत हे बसले होते तेवढ्यात बालचंद राठोड , राजेंद्र राठोड, यांनी संदीप यास अतिक्रमण करून घर बांधले आहे ते तुला थोडा वेळ लागेल असे बोलून शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर तेथे सुदाम बंजारा ,ज्ञानेश्वर बंजारा, राहणार चौपाळे यांनी देखील शिवी गाळ केली व चौघांनी मारहाण केली मारहाण सुरू असताना संदीप यांच्या दीपक प्रकाश कुमावत व 26 हा त्या ठिकाणी घेऊन भांडण सोडवित असतांना त्याला ही मारहाण करण्यात आली त्यांना मार सुरू असताना राजेंद्र राठोड ,यांनी दीपक कुमावत, यांच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारली त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी संदीप कुमावत यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार रामचंद्र राठोड, राजेंद्र राठोड ,सुदाम बंजारा, ज्ञानेश्वर बंजारा, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे