आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ रोजी वलवाडी शिवार येथील वडेल रोड लगत असलेले अरुण नगर येथील प्रसिद्ध राज राजेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती चे औचित्य साधत गणेश पूजा व होमहवन तसेच गणपतीचा अभिषेक श्री प्रॅफुल गुरुजी यांचे मार्गदर्शनखाली करण्यात आला. या प्रसंगी नुकतेच सेवानिवृत्त झालेले सशस्त्र सेना बल येथील सैनिक श्री शिवाजी गुलाबराव सुर्यवंशी यांना या होमहवन व अभिषेक तसेच पूजेचा मान देण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते होमहवन ,पूजा ,अभिषेक व सत्नारायण पूजा करण्यात आली.
हा कार्यक्रम झाल्यानंतर अरुण नगर येथील सर्व नागरिक व महिला मंडळ व तरुण मंडळी यांचे कडून महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले .प्रसंगी परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी श्री राज राजेश्वर गणेश मंदिरात येवून दर्शन घेतले व महाप्रसाद चा लाभ घेतला.व आजच्या कार्यक्रमात बहुसंख्य नागरिका मध्ये भक्ती भावाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले.
तद्नंतर गणेश आरती नंतर अरुण नगर येथे रहिवासी असलेले व मागील १८ वर्ष पासून देश सेवेत कार्यरत असलेले व दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी गांधी नगर गुजरात येथून सेवानिवृत्त होवून मायदेशी परतलेले
देशाची सेवा सिमे वर राहून करणारे सैनिक व त्यांचे त्याग,समर्पण ,व देश भक्ती यांचे जीवनगाथा लक्षात घेता सैनिक प्रती आपण त्यांना सन्मानित करावे अशी भावना प्रत्येक अरुण नगर येथील रहिवाशी मध्ये दिसून आली.आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून सेवा निवृत्त झालेले सैनिक श्री शिवाजी गुलाबराव सुर्यवंशी यांचा सपत्नीक सत्कार आमच्या अरुण नगर येथील असलेले ज्येष्ठ महिला व पुरुष मंडळी यांचे हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सर्वांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच इतर उपस्थित नागरिक यांनी देखील त्यांचा यथोचित सन्मान केला.
आजचा गणेश जयंती व सेवा निवृत्त सैनिक यांचा सत्कार सोहळा व महाप्रसाद फराळ कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री प्रफुल गुरुजी, पाठक बाबा,महेंद्र परदेशी, नानाभाऊ पाटील ,अरविंद गायकवाड सर्,मनोहर परदेशी,अमोल. जाधव ,रोहिदास भदाणे,श्रीकांत वाघ,सुनील मोरे,युवराज देवरे,सोनार सर्,विजय देवरे,शेगावकर सर्,प्रभाकर पाटील,शिंदे साहेब,किशोर ठाकूर,किशोर पाटील, प्रवीण शर्मा,संजय भदाणे,अशोक काळे,पंकज पवार, महेंद्र माळी,महेश लोहार,कमलेश पाटील, यशवंत महाले,निलेश महाजन,सुनील भाऊ,गोरख देवरे,रवींद्र शेलार,प्रशांत पाटील,संतोष चौधरी,मयूर सुर्यवंशी,किशोर भदाणे,नकुल खैरनार व अरुण नगर येथील तरुण, मंडळी महिला मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.