प्रतिनिधी (यकीन शेख) जालना : जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयात प्रसुत झालेल्या महिलेच्या एका दिवसाच्या बाळाची चोरी झाली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने जालना शहरात खळबळ माजली आहे. रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
रुखसाना अहेमद असे चोरी झालेल्या बाळाच्या आईचे नाव आहे. प्रसूतीसाठी या महिलेला शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. या महिलेने जन्म दिलेल्या बाळाची चोरी झाली आहे. कदीम पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.