नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

Hijab controversy: आमच्या घरचा ‘मामला’, पाय नका घालू, ओवेसींनी पाकिस्तानला झाप झाप झापले

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद (Hijab controversy) आता चांगलाच पेटला आहे. हिजाबवरून देशभरात निर्देशने होत आहेत. दरम्यान भारतामध्ये सुरू असलेल्या या वादात आता पाकिस्तानने (Pakistan) देखील उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी यावरून भारतावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या या मंत्र्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी चांगलेच सुनावले आहे. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष देऊ नये. पाकने भारतामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी आधी स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळावे असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे. ओवेसी म्हणाले की, मलालावर पाकिस्तानात हल्ला झाला आणि तिला पाकिस्तान सोडावे लागले. पाकिस्तानचे संविधान गैर-मुस्लिम व्यक्तीला पंतप्रधान बनू देत नाही. पाकिस्तानला माझा सल्ला आहे, इधर मत देखो… उधर ही देखो असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते उत्तर प्रदेशमधील एका मतदारसंघात प्रचारसभेत बोलत होते.

हिजाब हा भारताचा अंतर्गत मुद्दा

ओवेसी पुढे बोलताना म्हणाले की, तुमच्या देशात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याकडे लक्ष द्या. हीजाब घालावा की नाही घालावा हा आमचा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे पाकिस्तानने नसत्या भाणगडीत नाक खूपसू नये. त्यांनी आधी बलुच सांभाळावे. तुम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असा इशाराही यावेळी ओवेसी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानात आजही अनेक समस्या आहेत. त्या सोडवणे आवश्यक आहे. त्या पाकिस्ताने आधी सोडाव्यात मगच इकडे तिकडे लक्ष द्यावे असेही यावेळी ओवेसी म्हणाले आहेत.

पाकिस्तानचे मंत्री काय म्हणाले?

कर्नाटकमध्ये सुरू झालेल्या हिजाबचा वाद देशभरात पसरला आहे. देशात विविध ठिकाणी निर्दर्शने करण्यात येत आहेत. यावरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारतावर टीका केली होती. भारत मुस्लिम महिलांना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यापासून रोखून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहे. हा एक प्रकारचा जाच असल्याचे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानच्या या मंत्र्यांच्या टीकेला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चोख प्रत्युत्तर देताना आधी स्व:ताचे घर सांभाळण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:21 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!