प्रतिनिधी(अमित कुळकर्णी)डोंबिवली: आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करत तिला जखमी करत फरार झालेला पती सोमनाथ रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आला. घराबाहेर लावलेले कुलूप तोडून तो घरात शिरला आणि बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी सोमनाथ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसानी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. दरम्यान, सोमनाथ याला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहिती नुसार, त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणले असून त्या पिस्तूलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ही कशासाठी आणली होती? कोणाकडून घेतली हे प्रश्न अद्याप कायम आहे. (
डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ आरोपी सोमनाथ व त्याची पत्नी राहत असून चारित्र्यावर संशय आणि चोरीच्या संशयातून आरोपी सोमनाथ आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होते. या वादातून आठ तारखेला पुन्हा सोमनाथने पत्नीला मारहाण केली याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या पत्नीवर सोमनाथने भररस्त्यात चाकूने वार करत तिला जखमी केलं होतं. जखमी पत्नी वंदना हिला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमनाथ या घटनेनंतर फरार झाला आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
सोमनाथ देवकर याने त्याच्या पत्नीला आठ तारखेला चारित्रीच्या संशय घेऊन चाकूने वार करून जखमी केले होते. तेव्हापासून आरोपी सोमनाथ हा सापडत नव्हता. सोमनाथ हा नाशिकला जंगलामध्ये लपून बसला होता असे कळत आहे. तो काल रात्री आला. त्याने सकाळी स्वतःच्या छातीवरती स्वतःकडे असलेल्या पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्याचा प्रयन्त केला आहे. त्याला एम्स हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच रिव्हॉल्वर हे त्याने मध्यप्रदेश म्हणून विकत आणले असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. ते बेकायदेशीर पिस्तूल आहे आणि त्यांनी कोठून आणले कोणाकडून विकत घेतले याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.