नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बनावट कागदपत्रांद्वारे अधिकारी झाल्याचं सांगत फसवणुकीचे प्रकार समोर, एमपीएससी कारवाईचा बडगा उगारणार

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विट करत एमपीएससीमार्फत विविध परीक्षांद्वारे अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे काही उमेदवार

आणि व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीनं (MPSC) त्यांच्या निदर्शनास आलेल्या उदाहरणांची माहिती दिली आहे. एका महिला उमेदवारानं 2020 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत नापास असूनही खेळाडू प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याचं सांगत अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित संस्थांची फसवणूक करण्यात आल्याचं आयोगानं सांगितलं आहे. तर, जालना जिल्ह्यातही दुकानदार व्यक्तीनं राज्य करनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याचं सांगत सत्कार स्वीकारले असल्याचं आयोगानं निदर्शनासून आणून दिलं आहे. संबंधित व्यक्तीविरोधात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कारवाई करण्यात येत असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रकार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करवून त्याआधारे काही उमेदवार आणि व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या बाबी आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. एका महिला उमेदवाराने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये अनुत्तीर्ण असताना खेळाडू प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे भासवून अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित संस्थांची फसवणूक केली आहे. जालना जिल्ह्यातील एका दुकानदार व्यक्तीने राज्यकर निरीक्षक आणि राज्यकर उपायुक्त पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडून नियुक्ती झाली असल्याचे भासवून सत्कार स्वीकारत विविध संस्था आणि वर्तमानपत्र यांची फसवणूक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या उमेदवार आणि व्यक्ती यांच्यावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

आयोगानं माहिती मागवली

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांद्वारे नियुक्ती झाल्याची माहिती देत फसवणूक करणाऱ्या उमदेवार आणि व्यक्तींची माहिती द्यावी, असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलं आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:15 am, July 19, 2025
temperature icon 32°C
टूटे हुए बादल
Humidity 46 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!