जळगाव प्रतिनिधी:- चाळीसगांव येथील प्रभाग ९ मधील महावीर कॉलनी येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून सहा लाख रू.मंजूर करून श्री दत्त मंदिर परिसरात सभा मंडपाचे भूमी पूजनकामाचे शुभारंभ रिपाइंचे जिल्हा प्रमुख तथा नगर सेवक आनंद जी खरात यांच्या हस्ते करून परिसरातील जेस्ट नागरिकांच्या व महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने मानले आमदारांचे आभार…
घनश्याम जोशी गुरुजी यांच्याहस्ते पूजन करुन कार्यक्रमास सागर भावसार, देविदास कासार, वसंतदादा सोनवणे, आनंद धिवरे,पत्रकार स्वीपनील वडनेरे,खुशाल बिडे,हेमराज आखाडे,खुशाल कांबळे , जीबाऊ जगताप,सचिन महाजन,रमेश सोनवणे, दिनेश मंदानी, प्रकाश सोनवणे, मोहन कुलकर्णी,पुंडलिक माळी, आनिल शिंदे, निलेश पवार,सुमित पवार, विश्वास देशमुख, राजू सपकाळे, गोपाल सुर्यवंशी, अरुण अहिरे, भूषण रोखडे, नंदकिशोर बोरारे, हरपतसिंग तोम्बर, न्यानोबा वाघमोडे,गुलाबराव पाटील, बाबूसाहेब वाघ, भागवत कुमावत, पंडितराव पाटील, संभाजी पाटील , तुषार ठाकूर सर, योगेश वाघ,यांच्यासह मोठया प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.आलेल्या सर्व नागरिकांचे ठेकेदार स्वप्नील देवरे यांनी मानले आभार.