नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विसरवाडी पोलिसांचा पानबारा आश्रम शाळेकडून सत्कार

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार – गुन्ह्यातील आरोपी सापडत नसेल तर पोलिसांना दोष दिला जातो . एखाद्या गुन्ह्याचा उकल तात्काळ केल्याने पोलिसांचे कौतुक देखील झाले पाहिजे या उद्देशाने पानबारा शालेय प्रशासनाने पोलिसांचे कौतुक केले . नवापुर पोलिसांनी तीन जिल्हा परिषद शाळेतील चोरीचा अजून शोध लावला नाही त्यांनी देखील विसरवाडी पोलिसांचा आदर्श घेत शोध लावावा अशी चर्चा शैक्षणिक क्षेत्रात बोलली जात आहे . नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथे 12 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्री सोनखांब अनुदानित आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांनी शाळेतील 21 लॅपटॉप लंपास केले होते . आश्रम शाळेतील मुख्याध्यापक सह शिक्षक कर्मचारी चिंतेत होते . मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने सहाजिकच शिक्षकांची चिंता वाढली होती . या दरम्यान विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी आश्रम शाळेतील शिक्षकांना दोन दिवसात तुमचे लॅपटॉप शोधून देतो . असे आश्वासन दिल्याने दोन दिवसातच विसरवाडी पोलिसांनी लॅपटॉप चोरट्यांचा शोध घेत कारवाई केली व पानबारा आश्रम शाळेतील मुख्याध्यापक पी.पी वसावे सह शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचाऱ्यांनी विसरवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह विसरवाडी पोलीसांचा सत्कार करण्यात आला .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:08 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!