नंदुरबार – रविंद्र गवळे
फेस ता.शहादा येथे कृषि विभाग शहादा, यांच्यामार्फत मग्रारोहयो अंतर्गत कंपार्टमेंट बंडींग गट क्रमांक 2 या ठिकाणी दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी कामाचे उद्घाटन करुन कामाला सुरुवात करण्यात आली.
मग्रारोहयो अंतर्गत कंपार्टमेंट बंडींग चे कामे घेण्यासाठी कृषि विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.त्याच अनुषंगाने फेस येथे आज रोजी मग्रारोहयो अंतर्गत कंपार्टमेंट बंडींग च्या कामाचे उदघाटन करण्यात आले या योजने पासून शेतकऱ्यांना शासनामार्फत कामही मिळेल आणि आपल्या शेताचे बांध देखील मजबूत होतील तसेच पावसाळ्यात शेतातील गाळ वाहू नये म्हणून मदत होईल त्याच प्रमाणे पावसाळ्याचे पाणी चे देखील या कामामुळे जमिनीत मुरेल जेणे करून पाण्याची पातळी उंचावेल तसेच मजुरांना देखील काम मिळेल म्हणून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभ घ्यावा असे कृषी साहाय्यक श्री संतोष वळवी तसेच कृषी पर्वेक्षक कृष्णा निकुम यांनी सांगितले त्यावेळी फेस येथील शेतकरी श्री राहुल कोळी यांनी कामाचे उदघाटन केले तसेच गावातील शेतकरी सागर पाटील, संजय पाटील व इतर मजूर उपस्थित होते.