प्रतिनिधी : प्रवीण चव्हाण-नंदुरबार- येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवछत्रपतींच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.
नंदुरबार शहरातील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीनिमित्त प्रतिमापुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरातील शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याला जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, माजी नगराध्यक्ष रविंद्र परदेशी, इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या हस्ते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प.बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, वाहतुक पोलिस निरीक्षक राजेंद्र भावसार, इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नासिर बागवान, संचालक सैय्यद मकसुद, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा संघटक दत्तु पवार, समता परिषदेचे नंदुरबार शहराध्यक्ष इंजि.रामकृृष्ण मोरे, समता परिषदेचे जिल्हा संघटक वासुदेव माळी, निषाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रतापराव सोनवणे, प्रा.रजा मन्यार, फाऊंडेशनचे संचालक दानिश बागवान, रिजवान बागवान आदी उपस्थित होते.