प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा
नंदुरबार -नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने रेल्वेपुलाखालील मार्गावरील वाहतूक दि . २५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्याचे रेल्वे विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकान्वये दिले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , नंदुरबार ते नळवा रस्त्यावरील वरील रेल्वे पुल क्र १८८ जवळील कि.मी. १५५ / ११-१२ वरील . सदर रस्त्यावरील रेल्वेपुलाचे कामानिमित्ताने दि . १७ ते १ ९ फेब्रुवारी पर्यंत रेल्वेपुलाखालील मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती . त्यात आता वाढ करीत २५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचे आदेश रेल्वे विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकान्वये दिले आहे . त्यामार्गावरील वाहतुक इतरत्र मार्गावरून वळविण्यात आली आहे .
यामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने त्यावरील वाहतूक वरील व इतरत्र वळविणेबाबत रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येवून योग्य तो बंदोबस्त व बॅरेकेटींग करण्यात यावा . रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वे रूळाचे दुरुस्तीचे काम उक्त विहित केलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्यात यावे असे रेल्वे विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .