प्रतिनिधी – (दिप्ती पाटील) उरण – मा. सुनील पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस यांच्या सहकार्याने २२ वर्षानी उरण पोलीस स्टेशन येथे हळदीकुंकू समारंभ दि. १८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.प्रथमवर्ग दंडाधिकारी उरण कोर्ट जज्ज मा. प्रियांका पठाडे मॕडम यांच्या शुभ हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसिद्ध गायक मोहन फुन्डेकर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात ए मेरे वतन के लोगो हे गाणे गाऊन लता दीदी यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.उरण महिला पोलीस मपोहवा प्रणेती पाटील, रचना ठाकूर, मपोना कवीता हासे, प्रिती म्हात्रे, अमिता पाटील, मपोशी सुप्रिया ठाकूर,सुरेखा राठोड, प्रियांका पाटील,यांनी हळदीकुंकू समारंभासाठी आलेल्या सर्व महिलांना हळदीकुंकू लावुन भेटवस्तू दिली.महिलांन कडून हुकाने , डान्स, खेळ अशे विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे वातावरण एकदम आनंदीमय प्रसन्न झाल होत. कार्यक्रमासाठी उपस्थिती सौ. सायली म्हात्रे (उरण नगराध्यक्षा) , सौ. भावना घाणेकर (राष्ट्रवादी उरण विधानसभा),सौ.सीमा घरत (शेकाप उरण तालुका अध्यक्षा)सौ. रंजना तांडेल (शिवसेना उरण तालुका अध्यक्षा) , सौ. नायदा ठाकूर (माझी नगराध्यक्षा), सौ. आफशा मुकरी (उरण शहर काॕग्रेस अध्यक्षा),याच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली होती.बेलापूर येथील सुत्रसंचालीका मपोहवा शुभांगी पाटील यांनी मनोरंजन कार्यक्रमात श्री.व.सौ.अधिकारी, श्री.व.सौ. पाटील, श्री.व.सौ. कातकर ,श्री.व.सौ. म्हात्रे, श्री.व.सौ. गीते, श्री.व.सौ. पवार तसेच पीएसआय सोनावणे साहेब व सौ. यांचेकडून विविध मनोरंजन खेळ खेळुन घेतले. उरण वरिष्ठ पोलीस मा. सुनील पाटील,पीएसआय गायकवाड, पीएसआय सोनावणे, पोलीस निरीक्षक भीमराज शिंदे, युवराज जाधव, हरिदास गिते, सचिन पाटील यांच्या मोलाच्या सहकार्य मुळे कार्यक्रम साजरा करता आला. तसेच मोरा पोलीस स्टेशन च्या मपोहवा सौ. लता रजपूत, सौ. सचिता पाटील, सौ. पाटील मॅडम सुध्दा आवर्जून उपस्थित होत्या. उरण तालुक्यातील संगिता ढेरे, तुप्ती भोईर, लीना पाटील, कुसुम ठाकूर, समिया बुबेरे, गौरी देशपांडे, पत्रकार दिप्ती पाटील सह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. स्तोत्र : स्वतः दिप्ती पाटील