नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी विविध पक्ष आणि संघटना एकवटल्या

प्रादेशिक राजकीय पक्षांना बसणार हादरा..?

गडचिरोली/ चक्रधर मेश्राम दि. 20/2/2022:-
आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिनांक 20/2/2022 रोजी ठाकरे लाॅन येथे सामाजिक कार्यकर्ते विजय श्रृंगारपवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी आपली मनमोकळेपणे आणि बिनधास्तपणे एकजूट दाखवून आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील ही नवीन आघाडी सर्व शक्तीनिशी दोन्ही निवडणूकीत अनेक जागांवर प्रबळ उमेदवार उभे करण्याचे ठरविण्यात आले. या आघाडीच्या संघटनेमुळे काही प्रस्थापित राजकीय पक्षांना निवडणूक काळात चांगलाच हादरा बसणार आहे..
या बैठकीला पिरिपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, अभारिप चे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, मनसे चे जिल्हाध्यक्ष राजू साळवे, सेड्युल काॅस्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे , आपचे भास्कर इंगळे, बीआरएसपी चे डॉ. कैलास नगराळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे , भाकपाचे देवराव चवरे, जय विदर्भ चे अरुण मुनघाटे, एमआयएम चे जिल्हाध्यक्ष रमजान शेख, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी डॉ. नामदेव खोब्रागडे, हेमंत जंबेवार, सुनील पोरड्डीवार, नरेश महाडोरे, सोहल सय्यद, जितेंद्र न्यालेवार, डॉ. देवेंद्र मुनघाटे, अंकुश नैताम, डॉ. एन.बी.खोब्रागडे, जयवंत देशमुख, राज बन्सोड , मिलिंद बांबोळे, जीवन आधार फाऊंडेशन चे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम अभारिप चे राजन बोरकर , आदी सहीत अनेक राजकीय राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच एक संघटना जाहीर करून नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बऱ्याच ठिकाणी प्रबळ दावेदार असणारे उमेदवार रिंगणात उतरविले जाणार असल्याची माहिती आयोजक विजय श्रृंगारपवार, मुनिश्वर बोरकर यांनी दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:32 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!