प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -तळोदा पोलीस स्टेशन हद्यीतील सिलींगपुर ता . तळोदा जि . नंदुरबार येथे अवैधरित्या दारुविक्री करणाऱ्या आरोपीस तळोदा न्यायालयाने ३ वर्ष सश्रम कारावास व रुपये २५००० / दंडाची शिक्षा ठोठावली आहे . गुन्हयाची घटना दिनांक ०६/०५/२०२१ रोजी तळोदा पोलीस स्टेशन हद्यीत सिलींगपुर ता . तळोदा जि . नंदुरबार येथे आरोपीच्या घराजवळ घडली होती .
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि .पंडीत सोनवणे व पोलीस कर्मचारी हे कर्तव्यावर असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की , सिलींगपुर गावातील नामे दिपक फत्तु पाडवी हा त्याचे राहते घराचे पाठीमागे आडोश्याला गावटी हात भटटीची दारु कब्जात बाळगून चोरटी विक्री करीत आहे .
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि .पंडीत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोना .विनोद नाईक यांनी सोबत दोन पंच घेवून पोलीस स्टाफसह आरोपी जेथे मातीचे माट मध्ये गावटी हात भटटीची दारु घेवून विक्री करीता बसलेला असतांना दारु विक्री करीत असले बाबत संशय खरा असल्याने त्याचेवर छापा टाकून त्यास जागीच पकडले होते . त्यास जागेवरच चौकशी करुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक फत्तु पाडवी रा . सिलींगपुर ता . तळोदा जि . नंदुरबार असे सांगितले होते . छापा केला त्यावेळेस त्याचे कब्जातुन एकुण ९ ० लिटर गावठी हात भटटीची दारु जप्त करण्यात आली होती . सदर जप्त केलेल्या गावठी हात भटटीची दारुचा पंचनामा करुन रासायनिक विश्लेषणा करीता दारुचा नमुना काढण्यात आला होता . तरी दि .१६ / ०५ / २०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजेच्या सुमारास सिलींगपुर गावाता आरोपी दिपक फत्तु पाडवी रा . सिलींगपुर ता . तळोदा हा त्याचे राहते घराचे पाठीमागे गावठी हात भटटीची दारु चोरटी विक्री करतांना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द तळोदा पोलीस ठाणेत महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पो . ना . विनोद नाईक , तळोदा पोलीस ठाणे यांनी करून आरोपीविरुध्द मा . न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी मा . श्री . एस . डी . हरगुडे , जे.एम.एफ.सी. न्यायाधीश साो . तळोदा यांचे कोर्टात होवुन आरोपी दिपक फत्तु पाडवी रा . सिलींगपुर ता . तळोदा याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा शाबीत झाल्याने मा . न्यायालयाने सदर आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास व रुपये २५,००० / – दंडाची शिक्षा सुनावली आहे .
सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड . एम . आय . मन्सुरी यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ.देविदास वाडीले यांनी कामकाज केले.