प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार- तळोदा शहरातील खाज्या नाईक चौकातील महिला हया मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळया जागेत नैसर्गिक विधी करीत असतांना त्यांना भिंतीआड लपुन पाहणारा आरोपी दिनेश शांताराम चौधरी यास न्यायालयाने १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी रमन ताराचंद पाडवी वय ५५ धंदा मजुरी , रा . खाज्या नाईक चौक तळोदा जि.नंदुरबार यांच्या पत्नी तसेच खाज्या नाईक चौकातील इतर महिला हया मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळया जागेत नैसर्गिक विधीला जातात . सुमारे ७ ते ८ दिवसांपासुन सदर ठिकाणी सकाळी सकाळी एक इसम भिंतीच्या आडोश्याला लपुन उभा राहुन नैसर्गिक विधीला येणाऱ्या बायांना लपुन पाहत असतो असे फिर्यादी रमन पाडवी यांना समजले होते . दि . २५/०४/२०१३ रोजी सकाळी ०७.०० वाजता फिर्यादी यांच्या पत्नी व खाज्या नाईक चौकातील इतर महिला मलकवाडया मागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळया जागेत नैसर्गिक विधी करीता गेल्या त्यावेळेस कोण इसम बायांना भिंतीआडुन पाहतो म्हणुन फिर्यादी रमन पाडवी हे खात्री करण्याकरीता सुभाष टॉकीजचे शॉपींगसेटर मागे आडोश्याला उभे होते . त्यावेळी एक इसम भिंतीच्या आडोश्याला उभा राहुन महिला नैसर्गिक विधी करीत असतांना पाहत होता त्याच वेळेस फिर्यादी रमन पाडवी यांनी सदर इसमास त्याचे जवळ गुपचुप जावुन हटकले असता व त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा असे सांगितले होते व त्याला तु भिंतीआडु महिलांना का पाहतो ? असे विचारल्यावर तो तेथुन पळून गेला होता . दि . २५/०४/२०१३ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास तळोदा गावातील खाज्या नाईक चौकातील महिला हया गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळया जागेत नैसर्गिक विधी करीता बसल्या असतांना त्यांना भिंतीआड लपुन पाहणारा आरोपी दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा हा स्त्रियांना लज्जा वाटेल असे कृत्य करतांना मिळून आला म्हणुन त्याचे विरुध्द तक्रारदार रमन पाडवी यांनी फिर्याद दिली होती .
सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोहेकॉ . आनंदा पाटील यांनी करुन आरोपीविरुध्द मा . न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी मा . श्री . एस.डी. हरगुडे , जे.एम.एफ.सी. न्यायाधीश साो . तळोदा यांचे कोर्टात होवुन आरोपी दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा जि.नंदुरबार याचे विरुध्द भा.द.वि.क. ३५४ अ व ३५४ क अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने मा . न्यायालयाने सदर आरोपीस १ वर्ष कारावास व रुपये २,००० / – दंडाची शिक्षा सुनावली आहे .
सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड . श्रीमती एस . व्ही . वसावे यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ . देविदास वाडीले यांनी कामकाज केले आहे .
तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे मा . पोलीस अधीक्षक , नंदुरबार श्री . पी . आर . पाटील व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे .