प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात दि . 22 रोजी दोन गटात सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली . यात घरासह वाहनाची मोठया प्रमाणात तोडफोड झाल्याचे समजते . कौटूंबिक वादातून दोन गट आमने सामने भिडले होते . याबाबत उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात दि . 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास कौटूंबिक वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली . यावेळी मोठया प्रमाणावर वाहनांची व घराची तोडफोड करण्यात आली . या हाणामारीमुळे परिसरातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते .
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे पोलीस निरीक्षक किरण खेडकर , उपपोलीस निरीक्षक प्रविण पाटील हे तात्काळ पथकासह दाखल झाले होते . त्यांनी परिस्थिती नियंत्रण मिळवले . हाणामारीच्या घटने नंतर काही जणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे कळते .
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .