सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक )दिनांक ४ मार्च रोजी 12 वी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता, याच परीक्षेच्या भितीने प्रवेश प्रकाश बांगारे या युवकांने बोर्डाच्या पेपरच्या भितीमुळ त्याने शाळेच्याबाहेर जंगलात साधरण 8 च्या दरम्यान गळफास घेऊन आपले जिवन संपवले . मूळ राहणार पिंपळगाव , पोस्ट नागोठणे वय वर्ष १७ असुन हा विद्यार्थी सानेगाव मध्ये शिकण्यासाठी होता .
गेली दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन पद्धतीने मुल शिकत घेत होती. गावकडील भागात इंटरनेट ची सुविधा नसल्यामुळे मुलांना या दोन वर्षात नीट शिक्षण मिळालं नाही आणि आत्ता परीक्षा ऑफलाईन असल्यामुळं मुलांनमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे . या विरोधात मुलांनी अनेक ठिकाणी राज्यभर निदर्शने केली तरी सुद्धा सरकार ऑफलाईन परीक्षेबाबत ठाम होते. तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरक्षक संजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.