——————————————————- सुतारवाडी : दि. 8 (प्रतिनिधी) मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या रायगड भूषण पुरस्कार सुतारवाडी येथील पत्रकार हरिश्चंद्र महाडिक तसेच सुतारवाडी येथीलउद्योजक लक्ष्मी पाईप कंपनी चे मालक श्री. किरणशेट लडगे आणि सुतारवाडी येथील कराटे पटु ज्याने बॉक्सिंग खेळामध्ये 13 गोल्ड मेडल, दोन सिल्व्हर मेडल एकूण पाच नॅशनल गोल्ड मेडल आणि एक इंटर नॅशनल गोल्ड मेडल प्राप्त केला. अशा मंदार प्रकाश मोरे आदिंना रायगड च्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते – तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, रा.जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, बांधकाम सभापती निलिमाताई पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी ताई पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, आ. बाळाराम पाटील, मुख्याधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या बद्दल सुतारवाडी नाक्यावर उद्योजक श्री. मंगेश सरफळे आणि मित्र परिवारातर्फे पुरस्कार प्राप्तांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. दत्ताराम मंचेकर यांनी केले. तर माजी उपसरपंच श्री. माणिकराव सावंत महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघ रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष दळवी तसेच ग्राहक मंच कोकण विभाग अध्यक्ष श्री. मंगेशशेट सरफळे आदिंची पुरस्कार प्राप्त यांच्या विषयी गौरपर मनोगत व्यक्त केले. रायगड भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार हरिश्चंद्र महाडिक, उद्योजक किरणशेट लडगे, कराटे पटु गोल्ड मेडल प्राप्त मंदार प्रकाश मोरे आदिंनी आपल्या सत्काराबद्दल खास आभार व्यक्त केले. या वेळी श्री. दत्ताराम मंचेकर, श्री. चिंतामण दळवी, श्री. मंगेशट सरफळे, श्री माणिकराव सावंत, श्री. संतोष दळवी, श्री. राजू दळवी, श्री. लक्ष्मण कामथेकर, श्री. मयूर सावंत, डॉ. सचिन धनावडे, जगदीश खेतले (मॅनेजर), दिलीप जांभळे, प्रकाश मोरे, विष्णू भोसले, शिरिष तवटे, श्री. मनोहर महाडेश्वर, रविंद्र मामलुस्कर व विलास सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
फोटो captipn-:रायगड भुषण पत्रकार हरिश्चंद्र महाडिक, उद्योजक किरणशेठ लडगे, कराटे पटु मंदार मोरे यांचा सुतारवाडी नाक्यावर भव्य सत्कार करताना मान्यवर.