नंदुरबार – रविंद्र गवळे
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पी.आर पाटील यांनी जागतिक महिला दिनी काढलेली स्केच जिल्हा भरात चर्चेच्या विषय बनला आहे. त्यांच्या प्रत्येक स्केचचे जिल्ह्यातभरात कौतुक केले जात आहे. प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती कला हि अवगत असते.त्यामाध्यमातून ती व्यक्ती आपली कला दाखवत असते. पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटिल हे नेहमी महापुरुषांचा जयंतीनिमित्त हुबेहूब त्याचे स्केच बनवून आपली कला दाखवत असतात.तसेच विविध महापुरुषांच्या देवी-देवतांच्या फोटो स्केचने त्यांनी जिल्हा वासीयाची मन जिंकत असतात. ( S.P ) श्री पाटील हे नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून आपली वेगळी छाप निर्माण केलीच आहे. त्याच बरोबर दुसरीकडे एक उत्तम प्रकारे विविध स्केच बनवून स्केच आर्टिस म्हणून आपली दुसरी ओळख निर्माण प्रस्थापित केली आहे.त्यांच्या या कलेने त्यांचे जिल्ह्याभरात कौतुक केले जात आहे.