धुळे – धुळे तालुक्यातील बोरसुले येथे वीज कोसळल्याने शीतल राकेश गिरासे(वय-27) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी स्वतःच्या शेतात काम करत असताना शीतल गिरासे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने त्यांंचा घटना स्थळी जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.