प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -शहादा येथील टँकर चोरीतील आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेने पंजाब मध्ये अटक केली .
तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला . या प्रकरणी 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर पोलिसांनी हस्तगत केले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , तक्रारदार सुनिलसिंग रघुविरसिंग काला रा . हाऊस नंबर 44 धानेगांव ता.जि. नांदेड यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे सुनिलसिंग यांनी त्यांचे मालकीचे 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर हे नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यावर लावले होते ते विविध खांडसरी मधून मळी ( मोलेसीस ) भरुन लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यामध्ये वाहतुक करण्यासाठी त्यांनी टँकर भाडे तत्वावर लावलेले होते व त्या टँकर वर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग , बलविंदरसिंग बलदेवसिंग दोन्ही रा .अमृतसर पंजाब यांना चालक म्हणून ठेवलेले होते . परंतु दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी वरील दोन्ही इसमांनी सुनिलसिंग यांच्या मालकीचे दोन्ही टैंकर चोरुन नेले दोन्ही आरोपीतांविरुध्द् शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असल्यामुळे तसेच मालमत्तेची किमंत ही खूप मोठी असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा यांनी करुन मालमत्ता हस्तगत व आरोपीत यांचे वर कारवाई करणे बाबत आदेशीत केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली एक पथक तयार करुन तात्काळ पंजाब राज्यात रवाना केले . पंजाब मधील अमृतसर सारख्या मोठ्या शहरात जावून फक्त नावाने शोध घेण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे होते . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब मधील अमृतसर , तरण तारण , जिल्ह्यातील मेहता , बटाला , नांगली पिखीपिंड काले बियास इत्यादी गावांमध्ये जावून संशयीत दोन्ही आरोपीतांचा ठावठिकाणा शोधला , परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती . अमृतसर येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपीताच्या पत्नीची माहिती काढून तिच्या घराच्या आजू बाजुस वेषांतर करुन बातमीदारांचे जाळे निर्माण केले पंजाबमधील अमृतसर सारख्या नवीन शहरात देखील अवघ्या काही दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमीदार तयार करण्यात यश आले होते . तसेच पथक संशयीताच्या पत्नीच्या घराच्या आजुबाजुस रात्रंदिवस ए पि आय. संदिप पाटील यांनी वेषांतर करून पाळत .ठेवुन संशयीताच्या पत्नीच्या घरी येणारे जाणारे इसमांची माहिती घेत होते , परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांच्या नावा शिवाय काहीही नव्हते त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या . दि . 03 मार्च 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी त्याच्या घरी येणार आहे . बातमी प्रमाणे संशयीत आरोपी हा त्याच्या घरी सायंकाळी आला . त्याच्या पत्नीची भेट घेत असतांना अतिशय चालाख अशा संशयीत आरोपीतास आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो गेलो असल्याचे लक्षात येताच त्याने त्याठिकाणाहून पळ काढला, सापळा लावून बसलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे 1 किमी पाठलाग करून बलविंदरसिंग बलदेवसिंग रा . काले ता पिथीपिंड जि . तरण तारण पंजाब यास ताब्यात घेतले . त्याला शहादा येथील टँकर चोरीच्या गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा दुसऱ्या साथीदाराबाबत केल्याचे सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहता येथे तो जाऊन जोबनप्रितसिंग याचा शोध घेत असताना त्याला पोलीस पाठलाग करीत असल्याचा संशय येताच पळून गेला .
याबाबत बलविंदरसिंग बलदेवसिंग रा . काले ता . पिखीपिंड जि . तरण तारण , पंजाब यास शहादा येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि . 9 मार्च 2022रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . संशयीत आरोपी बलविंदरसिंग बलदेवसिंग याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेले 45 लाख रुपये किमंतीचे दोन्ही टँकर बाबत विचारपुस केली असता बलविंदरसिंग याने ते टँकर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर ताहराबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथे लपवून ठेवले असल्याबाबत सांगितले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर ताहाबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथे गेले असता पथकाला ढाब्याच्या पाठी मागे दोन्ही टँकर दिसले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील 45 लाख रुपये किमतीचे दोन्ही टँकर कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून ताब्यात घेतले फरार आरोपी जोबनप्रितसिंग तरलोकसिंग यास लवकरच बेड्या ठोकल्या . जातील असे यावेळी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे पोलीस अमंलदार विजय ढिवरे यांच्या पथकाने केली असू , पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करुन, तपास पथकास बक्षीस जाहीर केले आहे .