नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस , केळी बागेचेसह रब्बी पिकांचे नुकसान , नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -हवामान खात्याने तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता . हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शहादातालुक्यातील जयनगरसह परिसरातील निंभोरा , कोंढावळ , खापरखेडा , बोराळे , काकरदा येथे वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस झाला . त्यामुळे या गावांमधील काढणीवर आलेले केळी बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
साधारणता काल दि . 7 मार्च रोजी 4:30 वाजेच्या सुमारास जयनगरसह परिसरातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीटचा अवकाळी पाऊस झाला . त्यामुळे केळी बागेसह , पपई , गहू , हरभराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . गारपिटीच्या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे परिपक्व झालेले घडसहित केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर पडली आहेत . परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे . पण हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे . अवकाळी पावसामुळे इतर रब्बी पिकेही वाया गेली आहेत . ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे , त्यांचे गहू आडवे पडलेआहे . खरीप पिकांची कसर रब्बी पिकांमध्ये निघेल या आशेवर शेतकरी होता . मात्र अवकाळी पावसाच्या आगमनामुळे केळीसह गहू , हरभरा , पपई , कांदा , मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यायला हवी . अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:12 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 34 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!