प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -धानोरा चौफुली येथे शनेश्वर ट्रेडींग व शिवसागर ट्रेडर्स नावाचे धान्य खरेदी विक्रीचे गोडावून मधून 4 लाख 15 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी प्रकरणी 3 संशयीत आरोपींना पोलिसांच्या ताब्यात घेतले,
या बाबत अधिक माहिती अशी की , धनेश मोहनदास सेलवाणी रा . आदर्श नगर प्लॉट नंबर – 7 नंदुरबार यांचे धानोरा चौफुली येथे शनेश्वर ट्रेडींग व शिवसागर ट्रेडर्स नावाचे धान्य खरेदी विक्रीचे गोडावून आहे . दि . 24 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी धनेश सेलवाणी हे त्यांचे गोडावून बंद करुन घरी गेले रात्री श्री . शनेश्वर ट्रेडींग व शिवसागर ट्रेडर्स गोडावूनच्या मागील बाजुचा पत्रा कटरने कापून 4 लाख 05 हजार 600 रुपये किमतीचे एकुण 3 हजार 120 किलो वजनाचा अजवाईन ( ओवा ) , 5 हजार 500 रुपये किमतीचे 100 किलो तुर दाळ , 4 हजार 800 रुपये किमतीचे 120 किलो ओव्याचा भुसी असा एकुण 4 लाख 15 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला . म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक पथकाला योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ पथक तयार करुन कारवाई करुन गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याचे आदेशीत केले . दि . 6 फेब्रुवारी 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सेलंबा जि . नर्मदा गुजरात येथे एक इसम मोठ्या प्रमाणात अजवाईन ( ओवा ) ) विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्याने संयुक्त पथकाने तात्काळ सेलंबा जि . नर्मदा येथे जावून अजवाईन ( ओवा ) विक्री करण्यासाठी आलेल्या रघुवीर जनकसिंग चौहान रा . सेलंबा ता . सागबारा जि . नर्मदा यास ताब्यात घेतले . त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याला बावली ता . सोनगड जि . तापी येथील ईश्वर याने अजवाईन ( ओवा ) दिल्याचे सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेचे व उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तात्काळ बावली ता . सोनगड जि . तापी येथे जावून ईश्वर ची माहिती घेवून शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता . त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत त्याचा शोध घेऊन त्यास बावली येथील एका शेतातून ईश्वर देवल्या वसावा रा . बावली ता . सोनगड जि . याला अटक केली . त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यास रायंगण ता . नवापुर येथील संजु ने अजवाईन ( ओवा ) विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले . स्थानिक गुन्हे शाखे चे व उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तात्काळ रायंगण येथे जावून संशयीत इसम संजुची माहिती काढली असता तो गावात नसून नवापुर येथील एका पोल्ट्री फार्म मध्ये चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळुन आली . त्यामुळे संयुक्त पथक हे ताबडतोब नवापुर येथील पोल्ट्री फार्म मध्ये गेले असता संजु हा पोल्ट्री फार्म मध्ये दिसून आला . परंतु संजु यास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला . परंतु स्थानिक गुन्हे शाखे चे व उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने संजय दामु वसावे रा . पाटील फळी रायंगण ता नवापुर यास अटक केली . त्यास धानोरा येथील ओव्याच्या गोडावून चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांच्या मदतीने केला .असल्याचे सांगितले . या प्रकरणी रघुवीर जनकसिंग चौहान रा . सेलंबा ता . सागबारा जि . नर्मदा , ईश्वर देवल्या वसावा रा . बावली ता . सोनगड जि . तापी , संजय दामु वसावे रा . पाटील फळी , रायंगण ता . नवापुर यांना गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आली असून लवकरच गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपीतांना अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल, असे या वेळी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले सदर ची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार मुकेश तावडे , महेंद्र नगराळे , सजन वाघ पोलीस नाईक मनोज नाईक पोलीस अमंलदार शोएब शेख व उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केशव गावीत व पोलीस नाईक अंकुश गावीत यांच्या पथकाने केली असून पी . आर . पाटील , पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे व उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाचे अभिनंदन करुन तपास पथकास बक्षीस जाहीर केले आहे .