प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -तालुक्यातील शेतकऱ्यांची ४७ लाख रुपयांची पपई खरेदी करून त्यांचे पैसे न देता पसार झालेल्या व्यापाऱ्यास शहादा पोलीस व तालुक्यातील शेतकऱ्यांनी संयुक्तरीत्या तब्बल तीन दिवसांचा अथक परिश्रमानंतर उत्तर प्रदेशातून सरफराज इदवा चौधरी ( रा . हापूड , उत्तरप्रदेश ) या व्यापाऱ्याला ताब्यात घेत शहादा गाठले . संशयितास पोलिसांनी शहादा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , सरफराज चौधरी याने तालुक्यातील कलमाडी , मोहिदा , पिंगाने , शेल्टी आणि औरंगपूर येथील सुमारे ३० शेतकऱ्यांकडून पपई खरेदी करून त्यापोटी देय असलेले ४७ लाख रुपये न देता पळ काढला . याप्रकरणीशेतकऱ्यांनी शहादा पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली . गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताच्या पोलिसांकडून शोध सुरू असताना त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . मोरे व पोलीस कर्मचारी व शेतकऱ्यांनी संयुक्तरीत्या पथकाने दिल्ली गाठली . स्थानिक नागरिक व स्थानिक पोलिसांशी संबंधितांनी संपर्क साधला असता संशयित व्यापाराला याठिकाणाहून पकडून नेणे अवघड आहे . अशी माहिती मिळत होती . परंतु पोलीस पथक व शेतकऱ्यांनी जिद्दीने तीन दिवसानंतर संबंधित संशयितास ताब्यात घेऊन तब्बल १७ तास प्रवास करत शहादा गाठले . संशयित चौधरी यासपोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . व्यापाराच्या अटकेचे शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले .