नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा येथील सोनामाई कला व विज्ञान महिला महाविद्यालयात मामाचे मोहिदा येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘स्वच्छ भारत अभियान ‘ या थीमवर आधारित विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे मामाचे मोहिदे येथे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद् घाटन किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत चाळसे तर प्रमुख पाहुणे म्हणून मामाचे मोहीदे येथील सरपंच श्रद्धा पाटील , सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव , सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव , संस्थेचे समन्वयक संजय राजपूत , पुरुषोत्तम पाटील , पुष्पराज पाटील , पर्यवेक्षक सुरेश पाटील , शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हार्दिक पटेल , प्रा. अनिल साळुंके तसेच प्राध्यापक , राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका आदी उपस्थित होते.याप्रसंगी शिबिराचे उद् घाटक मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांनी , हे श्रम संस्कार शिबिर असून यातून सुसंस्कारांची रूजवणुक होत असते या संस्काराची शिदोरी विद्यार्थिनी या आपल्या घरी घेऊन जाणार आहेत, असे प्रतिपादन केले.यावेळी वर्षा जाधव यांनी, विद्यार्थिनींनी आपली काळजी घेत राष्ट्रीय कार्यासाठी कटीबद्ध रहावे, शिबिरातून मिळणाऱ्या संस्कारातून आपले व्यक्तिमत्व विकसन होते ,असे सांगितले.हे शिबिर ८ ते १४ मार्चपर्यंत होणार असून शिबिरासाठी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते असे : प्रा. डॉ. यू. व्ही. निळे (पर्यावरण व स्वच्छता), नवनाथ शेवाळे (पर्यावरण व मानव) प्रदीप नेरकर (ग्रामीण विकासात महिलांची भूमिका), प्राचार्य डॉ. व्ही. एस पाटील (पाणीव्यवस्थापन), उपप्राचार्य डॉ. डी. वाय. पाटील (माझी वसुंध अभियान) या तज्ज्ञ प्राध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दररोज प्रभात फेरी , प्रार्थना , स्वच्छ्ता अभियान , श्रमदान आदी केले जाणार आहे. प्रा. प्राचार्य डॉ. भारत चाळसे , प्रा. अनिल साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल पाटील तर आभार कार्यक्रम अधिकारी श्रीमती एच. आर. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. बी. आर. राजपूत, डॉ. प्रसन्ना डांगे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अधिक परिश्रम केले.