जामनेर/प्रतिनीधी-
यशवंतराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय गारखेडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा 28व्या निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातुन
जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते.
व तसेच
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. शाळेच्या गुणवत्तेवर गावाची प्रगती कळत असते . शाळेतील शिक्षक इमानेइतबारे अध्यापनाचे कार्य करीत असतात व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यात शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे. दहावीतील विद्यार्थ्यांनी येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यशसंपादन करून भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करावा असे गारखेडा येथे दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यालयातील मुख्याध्यापक अजय पाटील सरांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक माळी सर, चव्हाण सर ,व्ही के. महाजन सर , आर .जे पाटील सर, व्हि.पी चौधरी सर, ईगंळे सर, व्ही. जे .पाटील सर, ऐ.से.पाटील सर ,सोनवणे सर.व शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थीनीं आदी कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थित समारंभ संपन्न झाला.