कर्जत: जयेश जाधव:- कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेकडून महिला दिनानिमित्त आज कर्जत रेल्वे स्थानकाच्या आवारात महिला पोलिस कर्मचारी व महिला होमगार्ड यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आलायावेळी कर्जत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश होवाळ, रायगड शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, मोहनशेठ ओसवाल, शर्वरी कांबळे, कर्जत प्रवाशी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत रेल्वे स्थानकाच्या वेटींग रुममध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनी सांगितले की महिला या सर्व क्षेत्रांत कार्यरत असून महिला या पुरूषांच्या बरोबरीने काम करीत असून डाॅक्टर, पोलिस, पत्रकार,पायलट, राजकीय, शैक्षणिक,कला क्रीडा, नृत्य सिनेमा क्षेत्रात महिलांचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे त्यामुळे आजच्या काळात महिला कुठेही मागे नाहीत.असे त्यानी सांगितले . महिला पोलिस व होमगार्ड हे जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करीत आहेत त्यामुळे प्रवाशी सुरक्षितपणे प्रवास करत आहे.