.सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक ) रोहा तालुक्यातील पुगाव गावचे सुपुत्र उच्च शिक्षित तसेच शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे सेवा निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ पांडुरंग देशमुख यांनी आपल्या गावातील प्राथमिक शाळेला 5000 रुपयांची आर्थिक मदतीचा हात करत अधिक नामांकित कंपनीचे तीन सिलिंग फॅन भेट देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे येथील शालेय शिक्षक व विद्यार्थी वर्गात शिक्षणाचा अधिक दर्जा उंचावेल असे मोलाचे योगदान दिले आहे .एकनाथ पांडुरंग देशमुख यांचं प्राथमिक शिक्षण सुरवातीला याच शाळेत झाले होते परंतु शाळेतील एक आठवणीतील दिवस म्हणून ही भावना उराशी बाळगून ते पोलीस नोकरीच्या उच्च पदावरून सेवा निवृत्त होताच त्यांनी एक हात मदतीचा शैक्षणीक व सामाजिक सेवा म्हणून या शाळेस येथील विद्यार्थ्यांना स्काऊड गाईड व मुलांना लेझीम पथकासाठी रुपये 5000 रक्कम आर्थिक साहाय्यता मदत शाळेचे मुख्याध्यापक निवास थळे, यांना स्वईच्छने सुपूर्द करणतात आली यावेळी सहाय्यक शिक्षक प्रसाद साळवी,ग्राम पंचायत सदस्य गणेश म्हसकर सह आदी विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होते.