प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा
कृ .दा गावित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक संकुल कोरीट येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापिका श्रीमती नयना पवार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री मुकेश पाटील तसेच उपशिक्षक श्री व्ही डी पाटील सर प्रमुख अतिथी होते. प्रमुख वक्ते विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री एस व्ही विसपुते होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा श्रीमती नयना पवार तसेच विद्यालयातील सर्व महिला प्रतिनिधी शिक्षिका यांनी आई जिजाऊ व शिक्षण ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे मनोभावे पूजन केले. याप्रसंगी निबंध लेखन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा अक्षर लेखन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी विद्यालयातील आठवी ते अकरावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका श्रीमती ज्योत्सना देवरे मॅडम यांनी केलं याप्रसंगी श्रीमती मीनाक्षी पटेल श्रीमती सविता पाटील यांनी आपले जीवनातील प्रसंग व्यक्त करताना महिला म्हणून कार्य करताना अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं व विद्यार्थी-विद्यार्थिनींना सक्षमीकरण कसं होईल याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य श्री मुकेश पाटील सर यांनी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात आपले योगदान स्वीकारून स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं मग ते नोकरी असो कोणतेही कार्य क्षेत्र असो यात आपणास सहभागी व्हावे व आपलं स्थान निश्चित करावं असं त्यांनी सांगितलं .याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री एस व्ही विसपुते यांनी जागतिक महिला दिनाविषयी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? याविषयीचा इतिहास व या क्षेत्रा स्त्रियांनी केलेले कार्य यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ ,स्वातंत्र्य ज्योती झाशीची राणी यांच्या कार्याविषयी त्यांनी सांगितले. तसेच आजच्या या युगात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने केलेली अनेक क्षेत्रातील यशस्वी कामगिरी सांगताना अंतराळ क्षेत्रात कल्पना चावला यांनी केलेली वैज्ञानिक कामगिरी तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलेली कामगिरी लक्षणीय आहे असं त्यांनी सांगितलं .या कार्यक्रमासाठी विद्यालयातील श्री पी एस पाटील पटेल व्ही एस पाटील श्री एस पी ओगले श्री एम बी पाटील प्रा श्री भरत एम चव्हाण प्राध्यापक श्री अशोक पटेल प्राथमिक शिक्षक शशिकांत पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकेतर कर्मचारी श्री राजेंद्र सिंह राजपूत यांनी केले या कार्यक्रमाचे आभार श्रीमती सविता पाटील यांनी मानले