धुळे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये, पक्ष निरीक्षक विनयजी भोईटे साहेब यांच्या सूचनेनुसार , मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे धुळे तालुक्या च्या वतीने ग्रामीण भागात विविध उपक्रमां द्वारे वर्धापन दिन साजरा करण्यात आला .मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे तालुक्यातील तिखी डेडरगाव तसेच वार कुंडाणे व हेंद्रून या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप , तसेच वह्यांचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
तसेच दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत येथील महिला शिक्षकांना फेटे बांधत त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार देखील मनसेच्या वतीने करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मनसे धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी यांनी केले होते.
या कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष अॅड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव संदीप जडे, अजितसिंह राजपूत, तालुका उपाध्यक्ष शांताराम नवसारे ,दादा पाटील तालुका सचिव तुषार पोद्दार , विजय मिस्तरी व इतर पदाधिकारी व तालुक्यातील विविध कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.