धुळे:- जागतिक महिला दिनानिमित्त सायबर अवेरनेस फाउंडेशन तर्फे आयोजित सायबर जनजागृती करण्यासाठी व ऑनलाईन फसवणुकीपासून सावध होण्याचे धडे देण्यासाठी कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते. यावेळी ॲड चैतन्य भंडारी यांनी महिला सोबत होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावधान रहावे व महिलांचे आपले फोटोज व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर जसे की फेसबुक, इंस्टाग्राम अपलोड करण्याआधी प्रायव्हसी सेटिंग करावी व आपले सोशल मीडिया अकाउंट नेहमी लॉक करून ठेवावे व महिलांनी ऑनलाईन शॉपिंग करताना आपण ज्या ॲप किंवा वेबसाईटने शॉपिंग करत असाल किंवा वेबसाइट ही खरे आहे की फेक आहे याबाबत पूर्ण खबरदारी घ्यावी तसेच ऑनलाइन शॉपिंग नेहमी कॅश ऑन डिलिव्हरी करावी ऑनलाइन फसवणूक झाल्यास cybercrime.gov या संकेत स्थळावर तक्रार करावी व आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कानोसा कॉन्व्हेंट हायस्कूल चे प्राध्यापिका सिस्टर मोनिका कारडोसो, सौ मीनल देवेंद्रसिंग तवर यांनी देखील महिलांना ऑनलाईन सुरक्षिततेबाबत कशी खबरदारी घ्यावी याबाबत महिलांचे मार्गदर्शन केले. यावेळी फेसबुक लाईव्ह वरून सायबर अवेरनेस फाउंडेशन चा कार्यक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष व सदस्यांनी यशस्वीरित्या पार पडला.