भुवनेश दुसाने.(पाचोरा)
दिनांक~०९/०३/२०२२
सत्तर हजार रुपये किंमतीच्या कपाशीची चोरी करणा-या दोघा चोरट्यांना पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील नशिरोद्दीन युसूफ तडवी. वय (२९) वर्षे आणि आशिक अजित तडवी. वय (१९) वर्षे अशी या दोघ चोरट्यांची नावे असून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला दाखल कपाशी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
चोरीच्या कपाशीचा माल वरखेडी येथील व्यापा-यास दोघा चोरट्यांनी विकला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी तपास पथकाची निर्मिती करुन ते पथक रवाना केले होते. पथकाने दोघा चोरट्यांना शिताफीने वरखेडी येथून ताब्यात घेतले. दोघांनी पोलिसी हिसका बघून आपला गुन्हा कबुल केला. पोलिस पथकाने त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या ७००००/०० हजार रुपये किमतीच्या कपाशीपैकी एक क्विटल बावंन्न किलो वजनाचा ११,२४५ रुपये किंमतीचा कापूस हस्तगत करण्यात आला आहे.
दोघांनी गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल व एक मालवाहू रिक्षा असा कपाशीसह एकुण १ लाख ४१ हजार २४५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी तपासकामी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ मुरलीधर बारी, अशोक पाटील, राकेश कोंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस करत आहेत.