भुवनेश दुसाने.(पाचोरा)
पाचोरा:-पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे राहीलेले अनुदान त्वरीत मिळावे तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील रेशन वाटपातील सुरु असलेला घोळ मिटवून सर्व रेशनकार्ड धारकांना मोफतचे व स्वस्त धान्य पुरेपूर व दरमहा वेळेवर मिळावे याकरिता पाचोरा येथील कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाताखाली दिनांक २१ मार्च २०२२ सोमवार रोजी पाचोरा येथील आठवडे बाजारातुन ते थेट तहसील कार्यालयापर्यंत भव्य सिंगाडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
हा मोर्चा काढण्यामागचा हेतू असा की मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरासह तालुक्यातील गावागावात स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी २०२२ चा मोफत धान्यचा पुरवठा झालेला नाही म्हणून तो त्वरीत वाटण्यात यावा, तसेच पाचोरा शहरातील जवळपास २२०० शे दारीद्र रेषेखालील कुटुंब आहेत. मात्र पैकी केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जात असून इतर बी.पी.एल. धारकांना त्यांच्या हक्काच्या धान्याचा मागील विस वर्षापासून लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय होत आहे. अश्या वंचित कुटुंबाना तात्काळ समाविष्ट करण्यात येऊन तात्काळ धान्य वाटप करावे. तसेच ज्यांच्या हलगर्जीपणामुळे बी.पी.एल. धारक मागील विस वर्षांपासून वंचित राहिले त्यांची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
तसेच पाचोरा शहर व तालुक्यात काही मयत लाभार्थीच्या नावे धान्य पुरवठा केला आहे तो बंद करण्यासाठी संबंधित लाभार्थींनी संबंधित दुकानदारांना वेळोवेळी सुचित करुन सुध्दा त्यात बदल केला केला नाही. अशा बेजबाबदार दुकानदारासह संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. विधवा, परीतक्ता, दिव्यांग, अनाथ यांना बी.पी.एल. मध्ये समाविष्ट करण्यात यावे इत्यादी मागण्या रेशनकार्ड धारकांच्या आहेत.