जामनेर/प्रतिनीधी-
जळगाव जिल्ह्यातील सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर ग्राम विकास मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील शिक्षण मंत्री माननीय नामदार वर्षा गायकवाड यांची भेट घेतली त्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल भरण्यासाठी अनुदान व पालकमंत्री पाणंद रस्ते देणे बाबत चर्चा करण्यात आली चर्चेअंती सर्व पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना विनंती केली की सद्यपरिस्थितीत कोरोना महामारी मुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे, ग्रामपंचायती आर्थिक सक्षम नाही त्यामुळे पाणीपुरवठा वीज बिल थकीत होत आहेत त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे तरी कायमस्वरूपी तोडगा म्हणून राज्य शासनाने काही हिस्सा अनुदान म्हणून ग्रामपंचायती द्यावा व उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीने भरून पाणीपुरवठा वीज बिलांची समस्या कायमस्वरूपी सुटेल याबाबत मंत्रीमहोदयांनी सकारात्मक चर्चा केली यावेळी जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ जिल्हा समन्वयक श्रीकांत पाटील जामनेर तालुका अध्यक्ष राजमल भागवत तालुका समन्वयक बाळू चव्हाण यावल तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.