.—————————————————— सुतारवाडी : दि. 17 हरिश्चंद्र महाडिक :- येरळ, ता. रोहा येथील रहिवासी श्री. बाळकृष्ण नारायण आयरे यांची येरळ गावाला लागूनच जमीन आहे. या जमीनीमध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी विविध प्रकारची झाडे लावली होती. त्याचप्रमाणे सुंदर अशी झोपडी बांधली होती. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि वारा आला होता. या वाऱ्यामध्ये त्यांनी बांधलेल्या झोपडीवरील पत्रे, वासे उडून त्यांचेअतोनात नुकसान झाले. सायंकाळी 7 च्या सुमारास अज्ञान व्यक्तीने त्यांच्या फार्महाउस ला आग लावल्याने त्यांच्या फार्महाऊस मधील अनेक झाडे भस्मसात झाली. फार्म हाऊस गावापासून बाहेर असल्यामुळे अचानकपणे लागलेला वणवा कोणाच्याही लक्षात आला नाही. वणव्याचा धूर कोठुन येतो हे पाहण्यासाठी बालकृष्ण आयरे आपल्या जागेकडे गेले असता त्यांच्याच जागेत आग लागल्याचे समजले. मात्र तो पर्यंत सर्व झाडे जळून खाक झाली होती. आंब्याच्या झाडांना मोहोर आलेला होता. त्यांनी त्यांच्या फॉर्महाऊस मध्ये मोठा खर्च करून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली होती ती वायरही जळून खाक झाली आहे. हा वणवा पाच एकरात लागल्याने सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे बाळकृष्ण आयरे यांनी सांगितले. अनेक प्रकारची झाडे, झोपड्या ठिबक सिंचन वायर, सुकी लाकडं, किंमती वस्तू गुरांच्या वैरणीसाठी रचलेला गवत, झोपडीचे वासे, लागवड केलेला भाजीपाला तसेच अन्य वस्तु लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या असून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे. गेल्या वर्षी असाच वणवा लागला होता. परंतु एवढी हानी झाली नव्हती. हा वणवा हेतू पुरस्कार लावला जातो की, अचानक लागतो याचा शोध जंगल खात्याने घेणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे आहे.