रायगड प्रतिनिधी- ( हरिश्चंद्र महाडिक ) सुतारवाडी :- येरळ ग्रामस्थ मंडळ, शिवस्मारक समिती येरळ यांच्या वतीने श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा किल्ले रायगड येथून शिवज्योत येरळ येथे स्मारका पर्यंत आणणे, रांगोळी स्पर्धा, प्रश्नावली स्पर्धा, ” एक धाव आपल्या राज्यासाठी “, दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड ते श्री शिवतीर्थ येरळ, श्री छत्रपती शिवाजी मराराज यांचा अभिषेक सोहळा, पुजन व शिववंदना, स्नेहभोजन श्री. छत्रपती महाराजांचा पालखी सोहळा, वकृत्व स्पर्धा, श्री. श्रीकांत खताळ यांचे शिवव्याख्यान, ज्ञानाई हरिपाठ मंडळ येरळ यांचे हरिपाठ, यशस्वी स्पर्धकांचा गुण-गौरव सोहळा, ह.भ.प. किरण महाराज कुंभार यांचे शिवकिर्तन, त्याच प्रमाणे ग्रामस्थ मंडळ यांचे सुमधुर भजन आदि भरगच्च कार्यक्रम पार पडले.