वडाळी – पी.सी.पटेल
सारंगखेडा ता.शहादा येथील अशोक नथ्थु पाटील यांना शिंगवे येथे महानुभाव रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महानुभव पंथात दानशूर वृत्तीद्वारे कार्य केल्याबद्दल दत्तराज बाबा चिरडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन श्री.पाटील यांना गौरविण्यात आले. नाशिक जिल्हयातील श्रीदत्त शिंगवे येथील दत्त मंदिर ट्रस्ट व नांदगाव,चांदवड तालुका महानुभाव समिती मार्फत आयोजित श्री.दत्तबर्दी सेवा आश्रम उद्घाटन व संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे औचित्य साधुन महानुभाव रत्न पुरस्कार देण्यात आला. सारंगखेडा येथील वन विभागाचे निवृत्त अधिकारी अशोक पाटील यांनी महानुभाव पंथासाठी तन मन धनाने केलेल्या उल्लेखनिय सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.अशोक पाटील यांनी दानशुर वृत्तीने महानुभव पंथाची राज्यभरातील स्थानांचे , मंदिरांचे,आश्रमांचे जिर्णोध्दार कार्यात मोठी मदत केली आहे. धर्मकार्यात अग्रेसर राहून साधु संतांची सेवा कार्य केली आहे, करीत आहे.या उल्लेखनिय कामाचीच दखल घेत त्यांना महानुभाव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सारंगखेडा दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील आदींनी समाधान व्यक्त केले .