कर्जत :प्रतिनिधी – कर्जत कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिसेगाव फातिमा नगर येथे अनेक दिवसांपासून तेथे राहणारी बायमा उर्फ राखी विश्वनाथ शेट्टी नावाची महिला बेकायदेशीर गावठी दारुचा अड्डा राजरोसपणे विक्री करीत दहशत निर्माण करीत होती याबाबत स्थानिक रहिवाशांनी तिच्या त्रासाला कंटाळून रायगड पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे लेखी तक्रारी, अर्ज दाखल केल्या होत्या.या तक्रारीची पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी गांभीर्याने दखल घेऊन कर्जत पोलिसांना लेखी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याची कर्जत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठांचे आदेशानुसार दि २०/३/२०२२ रोजी सायंकाळी १८:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे फातिमा नगर, हनुमान मंदिराच्या टेकडीवर भिसेगाव येथे महिला आरोपी बायमा उर्फ राखी विश्वनाथ शेट्टी रा.फातिमानगर हीने विनापरवाना गैरकायदा ६१० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू स्वतः चे ताब्यात मिळुन आली या गुन्ह्यांत एकूण ६१० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू पोलीसांनी जप्त केली आहे. याबाबत कर्जत पोलिस ठाणे येथे गु.र.न ८०/२०२२ दारूबंदी अधिनियम कायदा अंतर्गत कलम 65(b),(c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना.अशोक राठोड हे करीत आहे.